आरोग्य विभाग
ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे याकरिता आरोग्य विभागा मार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा दिल्या जातात. कुटूंब कल्याण कार्यक्रमापासून ते साथरोग नियंत्रण कार्यक्रमापर्यंन्त वेगवेगळया राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावरुन केली जाते. गावपातळीवर आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून आरोग्य सेवेचे कामकाज करतात तसेच आरोग्य शिक्षण सुध्दा देतात. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यमांतर्गत अपेक्षित लाभार्थींना सेवेसाठी प्रवृत्त करतात व आवश्यकते नुसार योग्य ठीकाणी संदर्भ सेवा देतात.
आरोग्य विभाग सर्वसाधारण तपशिल
आरोग्य विभाग कार्यालयीन रचना
आरोग्य विभाग
अ.क्र. | संवर्ग | मंजुर पदे | भरलेली पदे |
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. |
योजनेचे नांव |
उद्देश |
आवश्यक कागदपत्रे |
अधिक माहिती |
1 | जननी सुरक्षा योजना | केंद्र शासनामार्फत राज्यातील ग्रामीण व शहरी आणि महानगरपालिका भागात जननी सुरक्षा योजना २००५-०६ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शासकिय आरोग्य संस्थेत अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यास देय आहे. | ग्रामीण भागातील रहिवासी असणा-या दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीमधील गर्भवती मातेची प्रसूती ग्रामीण अथवा शहरी भागात शासकिय अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत झाल्यास सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.७००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. . शहरी भागातील रहिवासी असणा-या दारिद्रय रेषेखालील अनुसुचित जाती व अनुसूचित जमातीमधील गर्भवती मातेची प्रसूती ग्रामीण अथवा शहरी भागात, शासकिय अथवा जननी सुरक्षा योजनेकरीता मानांकित करण्यात आलेल्या खाजगी आरोग्य संस्थेत झाल्यास, सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.६००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. ग्रामीण व शहरी भागातील फक्त दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील गर्भवती मातेची प्रसूती घरी झाल्यास सदर मातेस जननी सुरक्षा योजने अंतर्गत रु.५००/- याप्रमाणे लाभ देय राहिल. | डाउनलोड |
2 | जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम | जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांना तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये येथे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत गरोदर तथा ४२ दिवसा पर्यंतच्या
स्तनदा माता व एक वर्षापर्यतच्या आजारी बालकास लागणाऱ्या औषधे व साधनसामग्रीचा पुरवठा JSSK EDL प्रमाणे राज्य स्तरावरून करण्यात येईल.
| शासकीय आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गरोदर माता व ४२ दिवसा पर्यंतच्या स्तन मातांना तसेच वर्षापर्यंतच्या आजारी बालकास लागणारी सर्व औषधे व साधनसाम मोफत मिळेल याची दक्षता घ्यावी. | डाउनलोड |
3 | प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान | प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचे आयोजन दर महिन्याच्या ९ तारखेला व ९ तारखेला रविवार किंवा सुट्टी असेल तर त्यापुढील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविण्यात यावे. जिल्हा स्तरावर सदर अभियान प्रभाविपणे राबविण्यसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व कार्यकारी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्हयातील जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणुक करण्यात आलेली आहे. | प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत दुस-या आणि तिस-या तिमाहितील गरोदर मातांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून दयावयाच्या आहेत. प्रयोगशाळा चाचण्या, सोनोग्राफी तपासणी, तज्ञांद्वारे आरोग्य तपासणी, अतिजोखमीच्या मातांचे निदान व योग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा है या अभियानाचे प्रमुख घटक आहेत. हे अभियान कार्यक्षेत्रातील शासकिय संस्थांमध्ये राबविण्यात यावे. | डाउनलोड |
4 | मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत सुरु असलेल्या योजना | गरोदर मातांना प्रसुती पुर्व व पश्चात करीता मंजुरी लाभ, मातृत्व अनुदान योजना इ. | प्रत्येक स्तरावर उपलब्ध | डाउनलोड |
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. |
निर्गमित आदेशाचे नांव |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनु.जाती/ अनु.जमाती दारिद्र्य रेषे खालील बाळंत महिलेला देण्यात येणाऱ्या बुडीत मजुरीत वाढ करणे बाबत | १७/०२/२०१४ | डाउनलोड |
2 | मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढविणे व मानव विकासावर आधारित योजना राबविणे | १९/०७/२०११ | डाउनलोड |
3 | महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रमामध्ये नवीन योजनांचा समावेश करण्या बाबत | २४/०७/२०१३ | डाउनलोड |
4 | पावसाळ्यात उद्भवणाऱ्या जलजन्य साथ रोगांच्या उद्रेका बाबत करावयाची उपाय योजना | १०/०६/२००८ | डाउनलोड |
5 | राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षांचे निकष व कार्यप्रणाली | २९/०८/२०१२ | डाउनलोड |
6 | सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना मुलगा नसतांना त्यांनी एक किव्वा दोन मुलींच्या जन्म नंतर कुटुंब नियोजन शास्र्क्रिया करून घेतल्यास त्यांच्या मुली/ मुलींकरता विशेष प्रोत्साहनात्मक योजना | २४/०४/२००७ | डाउनलोड |
7 | सुधारित सावित्रीबाई फुले कन्या कल्याण युजना ०१/०८/२०१७ पासून बंद झाले बाबत | १६/०८/२०१७ | डाउनलोड |
संपर्क
अ.क्र. |
संपर्क नाव |
अधिक माहिती |
1 | तालुका वैद्यकीय अधिकारी | डाउनलोड |
2 | वैद्यकीय अधिकारी | डाउनलोड |