पंचायत समिती एरंडोल

ई-ऑफिस प्रणाली अंमलबजावणी बाबत जिल्हा परिषद जळगांव महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व  मा. उप  मुख्य कार्यकारी अधिकारी [सा.प्र.] यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद जळगांव मध्ये ई-ऑफिस प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन जिल्हा परिषद जळगांव यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याने मा. प्रधान सचिव , महाराष्ट्र राज्य श्री. एकनाथ डवले साहेबांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.

नवनियुक्त जिल्हा परिषद कर्मचारी यांचे 4 दिवसांचे पायभूत प्रशिक्षण

नवनियुक्त जिल्हा परिषद कर्मचारी व सहा, क सहा यांचे दिनांक 8 ऑगस्ट 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद जळगाव आयोजित कर्मचारी यांचे 4 दिवसांचे पायभूत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवा प्रवेशोत्तर परीक्षा २०२१ चा निकाल

महाराष्ट्र जिल्हा परिषद (जिल्हा सेवा) सेवा प्रवेशोत्तर परीक्षा २०२१ चा निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत बदल !

अमळनेर (जि. जळगाव) : जिल्हा परिषद शिक्षकांच्या (ZP Teachers) जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन (online) पद्धतीने सुरू आहे. ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार सेवेची परिगणना ३१ मेपर्यंत केली जात होती. मात्र २०१९ च्या बदली प्रक्रियेतील अतिदुर्गम डोंगराळ भागातील कार्यरत शिक्षक हे त्या पदावरील ३ वर्षांचा कालावधी ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करीत नसल्यामुळे त्यांच्यावर […]

शेकऱ्यांनो लक्ष द्या : आवश्यकतेप्रमाणे खते उपलब्ध असल्याने अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरुन ठेवू नये

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२२ । खरीप हंगाम 2022 हंगामात जिल्हयात खत पुरवठा सुरळीत सुरु आहे. एप्रिल व मे, महिन्यात आवश्यकतेप्रमाणे खत पुरवठा कंपन्यांमार्फत करण्यात आलेला आहे.  युरीया या खताचा 60910 मे. टन साठा विक्री साठी उपलब्ध आहे. डीएपी खताचा 6493 मे. टन. एमओपी खताचा 8544 मे. टन एनपीके संयुक्त खतांचा 28690 मे. टन […]

जी प कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ; भ.नि.नि खाते उतारे संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ एप्रिल २०२२ | जिल्हा  परिषद कर्मचऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे सन २०२०-२१ चे खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.           मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सोयीचे होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. त्याच दृष्टीने भविष्य निर्वाह निधीचे […]

फाईल कुणाकडे, किती दिवस होती; क्यूआर कोडद्वारे मिळणार इत्यंभूत माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा परिषदेत क्यूआर कोडद्वारे फाईलची ट्रॅकिंग करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे फाईल कोणत्या अधिकाऱ्याकडे व किती दिवस होती यासह फाईलची इत्यंभूत माहिती प्रशासनाला मिळणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे फाईल दाबून ठेवण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. एकाच […]

सकारात्मक पाऊल : जि.प.च्या ६५ शाळा करणार रेनवॉटर हार्वेस्टिंग

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग करायला पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील १८ शाळांमध्ये रेनवाॅटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात आली आहेत. यामुळे शाळेच्या छतावर पडणारे पाणी थेट जमीनीत मुरवले जाईल. इतर ४७ शाळांमध्ये ही कामे सुरू आहेत.भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. त्यामुळे पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरवणे […]

जि.प. मुख्याधिकाऱ्यांचा भन्नाट फंडा, सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन देण्याचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । जिल्हा परिषदेचा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पेन्शन साठी वणवण भटकावे लागू नये म्हणून सेवानिवृत्तीच्या दिवशीच संबंधित कर्मचाऱ्याला पेन्शन आदेश ( पीपीओ ) देण्याची अभिनव संकल्पना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . पंकज आशिया यांनी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि. ३१ मे रोजी जिल्हा […]

माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्याचा गौरव

जळगाव लाईव्ह न्युज | ५ जून २०२२ | माझी वसुंधरा अभियान 2.0 मधील जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी झाली असल्याने पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.तसेच विभागाची ही उत्कृष्ट कामगिरी झाल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा सत्कार करण्यात आला जिल्ह्याच्या वतीने सदरील सन्मान जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत, जिल्हा […]

म्हसावद रोड, पंचायत समिती, एरंडोल

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2025 Panchayat Samiti Erandol. All rights reserved @Panchayat Samiti Erandol. | मार्गदर्शक: श्री. डी. इ. जाधव - गट विकास अधिकारी, श्री. विजय उत्तम अहिरे - सहाय्यक गटविकास अधिकारी | सहकार्य - श्री. डी. एस. माळी,स. प्र. अ., श्री. योगेश पाटील क.प्र. अ
Website Designed & Developed by निलेश मधुकर पालवे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी, एरंडोल
Necessary information / data is taken from ZP Jalgaon's official website.

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.