बोदवड पंचायत समिती
प्रस्तावना
पंचायत समिती बोदवड हा जळगाव जिल्हा परिषद,अंतर्गतचा महत्वपुर्ण तालुका असुन त्यात वेगवेगळे आदिवासी व बिगर आदिवासी विविध विभागाकडील योजना विविध सवर्गाची आस्थापना विषयक कामे ,पेन्शन,खाते चौकशी विविध प्रकारच्या तक्रारी,असे अनेक प्रकारचे कामकाज करण्यात येतात.
तपासणी,माहिती,आवकजावक,सर्व सभांबाबतचे कामकाज व पदाधिकारी यांना योजनांची माहिती पुरविणे,वाहनांचे देखभाल अधिकारी यांच्या फिरस्ती कार्यक्रम व मासिक दैनंदिनी करणे,विविध सभेची माहिती संकलीत करणे,विभागाअंतर्गतचे संवर्गात कार्यरत कर्मचा-यांच्या विनंती अर्जानुसार कार्यालयीन कामकाज करणे ,माहिती अधिकारान्वये,माहिती उपलब्ध करून देणे, व टपाल घेणे व देणे असे अनेक विषय समाविष्ट आहे.महाराष्ट्र शासकिय कर्मचा-यांचे बदल्यांचे विनियमन आणि शासकिय कत्रव्या पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंधअधिनियम 2009 मधील कलम 8 मधील तरतुदीनुसार पंचायत समिती बोदवड ची नागरीकांची सनद प्रसिध्द करण्याकरीता अशा विधि विषयांशी संबंधित असणा-या सेवा तत्परतेने सौजन्यपुर्वक व सन्मान पुर्वक नागरीकांना उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग बांधील राहील.
पंचायत समिती बोदवड ची रचना
मा.गट विकास अधिकारी, (उ.श्रे) पंचायत समिती बोदवड चे प्रमुख आहे.प्रशासकिय कामकाजाकरीता सहाय्यक प्रशासन अधिकारी हे वरीष्ठ प्रशासकिय अधिकारी आहे.जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची उपविभाग हे गट स्तरावर असुन संबंधित वरिष्ठ कार्यालयाने या गटात पदस्थापना दिलेले त्यांचे संबधित अधिकारी व कर्मचारी हे त्या-त्या विभागाचे कामकाज पार पाडीत आहे.त्या बाबत सविस्तर माहिती सोबतच्या परिशिष्ट -1 मधे नमुद केलेली आहे.