- मुख्यपृष्ठ
- तालुकाविषयी
- पंचायत समिती
- प्रतिनिधी व अधिकारी
- पंचायत समिती विभाग
- सामान्य प्रशासन विभाग
- ग्रामपंचायत विभाग
- कृषी विभाग
- पशुसंवर्धन विभाग
- आरोग्य विभाग
- महिला व बालकल्याण विभाग
- बांधकाम विभाग
- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
- जिल्हा जलसंधारण विभाग
- प्राथमिक शिक्षण विभाग
- माध्यमिक शिक्षण विभाग
- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन
- समाज कल्याण विभाग
- अर्थ विभाग
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- यांत्रिकी विभाग
- पं. स.अंतर्गत कार्यरत अधिकारी
- नागरी सेवा विषयक
- प्रसार प्रसिध्दी
- संपर्क
ऐतिहासिक पर्यटन स्थळे
फरकांडे, एरंडोल येथील झुलते मनोरे

ऐतिहासिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले फरकांडे येथील झुलते मनोरे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तीन घुमटांच्या मशिदीचे पुढील दोन मिनार म्हणजेच झुलते मनोरे. मात्र, सध्या ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
जळगाव- धुळे महामार्गावर जवळपास ३० किलोमीटरवरील एरंडोल हे तालुक्याचे ठिकाण. येथून जवळपास १२ किलोमीटरवर कासोदा आणि तीन किलोमीटरवर फरकांडे गाव आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले फरकांडे येथील झुलते मनोरे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. तीन घुमटांच्या मशिदीचे पुढील दोन मिनार म्हणजेच झुलते मनोरे. मात्र, सध्या ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, फरकांडे येथे पोहोचल्यावर गावातूनच एक मार्ग या प्रार्थनास्थळापर्यंत जातो. यातील एक मनोरा २१ मार्च १९९१ रोजी कोसळल्याने फक्त एकच मनोरा राहिला आहे. तोही शेवटच्या घटका मोजत आहे. मनोऱ्यांची उंची १५ मीटर आहे. आतील बाजूस १५ मीटर लांबीची महिरपींची एक भिंत आहे. मनोऱ्यावर जाण्यासाठी मनोऱ्याच्याच आतील बाजूस गोलाकार पायऱ्या आहेत. अतिशय रुंद असलेल्या या मनोऱ्यातून एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो. मनोऱ्यावर चढताना काही ठिकाणी प्रकाश व हवा येण्यासाठी जागा (खिडकी) सोडण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय रुंद असलेल्या या मार्गातून जाताना श्वास कोंडला जात नाही. वर टोकावर पोहोचल्यावर चारही बाजूने लहान कमानी आहेत. त्यामुळे टोकावर बसून तुम्ही संपूर्ण गावाचा परिसर पाहू शकतात. त्याचप्रमाणे या मनोऱ्यावर बसून मनोरा हलविल्यास दुसरा मनोरा आपोआप हलायचा, तर पूर्वी दोन्ही मनोऱ्यातील भिंतदेखील हलत होती, असे म्हटले जाते. त्यामुळे या वास्तूला झुलते मनोरे अर्थात 'स्विगिंग टॉवर्स ऑफ फरकांडे' म्हणून संबोधले जाते. आता यातील एक मनोरा पूर्णपणे ढासळला असून, त्याचा ढीग बाजूलाच पडलेला आहे.
चारशे वर्षांपूर्वीचे बांधकाम काहींच्या मते, ही मशीद ४०० वर्षांपूर्वी फारुकी राजवटीत बांधली गेली असावी व फारूकी घराण्यावरूनच या गावास फरकांडे हे नाव पडले असावे. येथे हत्तींचा व्यापारदेखील प्रसिद्ध होता, असे म्हटले जाते. तंत्रशुद्ध पद्धतीने बनविण्यात आलेली ही वास्तू वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. फरकांडे हे गाव भुईकोट किल्ल्यात वसले आहे. परिसरात आजही काही ठिकाणी किल्ल्याचे अवशेष आणि गावाच्या भोवती तटबंदीचे भग्नावशेष दिसतात. झुलते मनोरे असलेल्या मशिदीच्या वास्तूत प्रवेश करताच डाव्या बाजूस पाण्याचा हौद बांधण्यात आला आहे. तो आजही सुस्थितीत आहे. मशिदीच्या मागे असलेल्या विहिरीतून या हौदात पाणी आणण्यासाठी विटांचा नाला बांधण्यात आला होता; परंतु तो आता मध्यमागी तुटल्यामुळे हौदात पाणी येत नाही. हत्तींसाठी या हौदाचे बांधकाम करण्यात आल्याचे म्हटले जाते. ऊतावळी नदी ब_हाणपूरपासून येथे वहात येते.
जाण्याचा मार्ग
जळगाव- धुळे महामार्गावर जवळपास ३० किलोमीटरवरील एरंडोल हे तालुक्याचे ठिकाण. येथून जवळपास १२ किलोमीटरवर कासोदा आणि तीन किलोमीटरवर फरकांडे गाव आहे. नवख्या माणसाला तसं या गावांपर्यंत पोहोचणं अडचणीचं ठरेल; परंतु योग्य मार्गाने आणि वाटेत विचारपूस करीत गेल्याने या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणे सोपे जाईल. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी असल्याने एरंडोलपासून फरकांडेपर्यंतच्या प्रवासात ऊन-सावलीचा खेळ अनुभवता येतो. तुमच्या या प्रवासात बाइकची जोड असेल तर प्रवासाचा खरा आनंद तुम्हाला घेता येईल.
श्री क्षेत्र पद्मालय

देशभरात प्रसिध्द असलेल्या गणपती मंदिरापैकी एक महाभारत कालीन श्री क्षेत्र पद्मालय गणपतीचे मंदिर. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावापासून केवळ अकरा किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र पद्मालय देशभरात प्रसिध्द आहे. मंदिराचा परिसर घनदाट जंगल, जवळ असलेल्या तलाव, तलावातील विविध प्रकारचे रंगबिरंगी कमळाचे फुल हे भाविकांना आकर्षीत करतात.
श्री गणेशाच्या साडेतीन पिठांपैकी एक हे श्री क्षेत्र आहे. पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये एक आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानीत आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या दोघी सोंडेची गणपती मुर्ती विराजीत असून, जगातील हे एकमेव असे मंदिर आहे.
मंदिराला महाभारताचा इतिहास महाभारताच्या काळात पांडव अज्ञातवासेत असतांना या ठिकाणी तलावात आंघोळीसाठी येत असत अशी काल्पनिक अख्यायिका आहे. तसेच पांडवकाळात भिम व बकासुराचे युद्ध झाल्याची काल्पनिक कथा आहे. बकासुराचा वध केल्यानंतर भिमाला तहान लागल्याने त्याने आपल्या मुठीचा जोरदास प्रहार खडकावर केल्याने त्या ठिकाणी खोल खड्डा पडला; त्यास भिम कुंड म्हणून ओळखले जाते. भिम कुंड परिसरात आजही भाताचा कण असल्याच्या पांढऱ्या खुणा आढळून येतात. एरंडोल शहरात असलेल्या पांडववाड्यातून श्री क्षेत्र पद्मालय येथे जाण्यासाठी भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते.
मोठा घंटा आणि जातं

जगात केवळ पद्मालय येथे श्रींच्या दोन मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे. सद्गुरू गोविंद शास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाली होती त्यामुळे या मंदिराचा जिर्नोद्धार त्यांनी केला असून, गणेश पूराणात या गणपती मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काशी ईश्वेश्वर येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे या मंदिराची निर्मीती असल्याचेही सांगण्यात येते. येथे ४४० कि.ग्रा. वजनाचा एक भला मोठा घंटा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे.
मंदिराची रचना हेमाडपंथी मंदिर पुरातन असून मंदिराची संपूर्ण बांधकामाची रचना ही हेमाडपंथी आहे. मंदिरात डाव्या-उजव्या सोडेंचे गणपती आहे. मंदिरासमोर भव्य घंटा असून प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे. मंदिरापासून सुमारे दोन ते तिन किलोमीटरच्या अंतरावरील घनदाट अरण्यात असलेल्या भिमकुंड आहे.
मंदिर परिसर निसर्गाने नटलेला मंदिराला लागून तलाव असून मंदिराच्या सौंदर्य फुलवते. तर तलावातील विविध प्रकारचे व रंगाचे कमळाचे फुल भाविक व पर्यटनांसाठी आलेल्यांना आकर्षीत करत असते. पावसाळ्यात संपूर्ण जंगलात हिरवेगार वृक्षाची आकर्षक दृष्य दिसत असल्यामुळे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद भाविकांना या श्री क्षेत्र पद्मालय मंदिरात येणाऱ्यांना मिळतो.
चतुर्थीला भाविकांची गर्दी पद्मालय मंदिर प्रसिद्ध असून गणेश भक्तामध्ये श्रद्धास्थान आहे. त्यामुळे अंगारकी चतुर्थी तसेच संकष्ट चतुर्थीला न चुकता गणपतीचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. तसेच नवस फेडण्यासाठी देखील महिला वर्गासह विविध कार्यक्रम पद्मालय क्षेत्रात होत असतात. गणेश उत्सवात तर पद्मालय मंदिरात तर भाविकांची प्रचंड गर्दी असते. मंदिर संस्थानाकडून देखील भाविकांसाठी चांगल्या सुविधा येथे करण्यात आले आहे.