ग्राम पंचायत विभाग
ग्राम पंचायतींशी संबधीत कामकाज करणे व योजना राबविणे. ग्रामीण भागातील नागरीकांच्या लोकसहभागातुन राष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राम पंचायतींचा विकास करणे. जिल्हा परिषदेकडील/शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारीमार्फत गावपातळीवर सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे. राज्य, केंद्र, जिल्हा प्रशासन इ. विवीध योजना राबविणे तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन लोकसहभागातुन सर्वांगीण विकास करणे. ग्रामपंचायत विभागाकडील उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या सेवा या ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असुन सदरील सर्व प्रकारच्या सेवा या ग्रामपंचायतींेचे सरपंच, तसेच ग्राम पंचायतीचे सचिव तथा ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांचे माध्यमातुन पुरविण्यात येत असतात.
ग्राम पंचायत विभाग सर्वसाधारण तपशिल
ग्राम पंचायत विभाग कार्यालयीन रचना
ग्राम पंचायत विभाग
अ.क्र. | संवर्ग | मंजुर पदे | भरलेली पदे |
विविध शासकीय योजनांची माहिती
अ.क्र. |
योजनेचे नांव |
उद्देश |
आवश्यक कागदपत्रे |
अधिक माहिती |
1 | 15 वा वित्त आयोग | शासन निर्णय क्र .पंविआ-2020/प.क्र59/वित्त-4/दि. 26 जुन 2020 मधील मार्गदर्शक सुचनानुसार 15 वा वित्त आयेाग लागु करण्यात आलेला असून त्यात बंधित व अबंधित निधी 50-50 टकक्याच्या प्रमाणात विभागण्यात आलेले आहे. यात मंंजुर अनुदानातुन ग्राम पंचायत स्तर 80 टक्के, पंचायत समिती स्तर 10 टक्क्े , तर जि.प. स्तर 10 टक्क्े या प्रमाणात निधी वितरीत करण्यात येतो. सन 2020-21 या वर्षी पहिला हप्ता वितरीत असुन वेळोवेळी प्राप्त होणारा बंधित/अबंधित निधी शासन मार्गदर्शक सुचनानुसार कार्यवाही करण्यात येते.
सदर निधी शासनाच्या 14 जुन 20221 च्या शासन निर्णयाच्या मार्गदशक सुचनेनुसार ग्रामपंचायतीने तयार केलेल्या आमचा गाव आमचा विकास आराखडयातील कामे/उपक्रमावर खर्च करावयाच्या आहे. | | डाउनलोड |
2 | स्मार्ट ग्राम योजना | पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर स्मार्ट ग्राम योजनेत करण्यात आलेले आहे. शासन निर्णय 21 नोव्हेंबर 2016 नुसार स्वच्छता,व्यवस्थापन,दायीत्व,अपारंपारीक उर्जा आणि पर्यावरण इ.निकषानुसार प्रत्येक तालुक्यातुन एका पात्र ग्रामपचंायतीस 10 लाख रुपयांचे पारितोषीक देण्यात येते. सदर ग्रामपंचयतीची निवड दुसऱ्या पंचायत समितीची निवड समिती करते. तालुक्यातील पात्र ग्रामपंचायती मधुन जिल्हास्तरीय निवड समिती जिल्हास्तरावर एक ग्रामपंचायत निवड करेल व अशा निवड झालेल्या ग्रामपंचायतीस पारितोषीक देण्यात येते. | | डाउनलोड |
3 | आमच गाव,आमचा विकास आराखडा | शासन निर्णय 4 नोहेम्बर 2015 च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावाचा 5 वर्षाचा बृहत आराखडा तयार करावा,प्रत्येक वर्षी गाव विकास आराखडा तयार करावा. वाषिर्क आराखडा तयार केल्यानंतर ग्रामसभेची मान्यता घेऊन तो पंचायत समिती च्या तांत्रिक छाननी समिती कडे पाठविण्यात येतो. पंचायत समिती स्तरावरील तांत्रिक छाननी समितीने सदर आराखडा तांत्रिक दृष्या बरोबर असल्याची खात्री करुन सदर आराखडा ग्रामपंचायतीकडे पाठविते. ग्रामपंचायत आराखडा ग्रामसभेची अंतीम मंजुरी घेऊन त्यातील उपक्रम व कामे यांचे प्राकलन तयार करुन त्यास तांत्रिक मान्यता घेऊन अशा कामांना ग्रामपंचायत मासिक सभा प्रशासकीय मान्यता देते. ज्या विभागाकडुन अनुदान प्राप्त होते त्या विभागाचे सक्षम अधिकारी कामांचा कार्यारंभ आदेश देते. ग्रामविकास आराखडा, त्यातील कामे व कामावरील खर्च शासनाने विकसित केलेल्या Plan-Plus या आज्ञावलीत नोंदविणे आवश्यक आहे. | | डाउनलोड |
4 | जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज योजना | • महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 133 व त्या खाली तयार करण्यात आलेले मुंबई जिल्हा ग्रामविकास निधी नियम 1960 मधील तरतुदीनुसार पंचायतींनी दिलेल्या अंशदानातून प्रत्येक जिल्हयात जिल्हा ग्राम विकास निधी स्थापन करण्यात आलेला आहे.
• सदर निधीचा उपयोग हा ग्रामपंचायतीनां उक्त अधिनियमातील कलम 45(1) च्या अनुसूचीत एक मधील विहीत केलेले कर्तव्ये पार पाडण्याच्या दृष्टिने पंचायतींना कर्जे देण्यासाठी केला जातो.
• ग्रामपंचायत प्रत्येक वित्तीय वर्षी कलम 133 अन्वये जिल्हा ग्राम विकास निधीस,मागील वित्तीय सर्व स्त्रोतापासून ( शासनाकडून मिळालेल्या अंशदानासह ) उभारलेल्या तिच्या उत्पन्नाच्या 0.25 टक्के इतके अंशदान देईल.
• ग्रामपंचायतीनां कर्ज मंजूर करतांना तिच्या अलीकडील तीन आर्थिक वर्षाच्या सरासरी शिल्लकी उत्पन्नाच्या 20 पट व उत्पादक स्वरूपाची कामे घेतल्यास 30 पट इतक्या रक्कमेचे कर्ज निधी मधून देता येते.
• कर्जाची रक्कम
• 60,000/- रूपयाहून अधिक असेल तर,त्या बाबतीत कर्ज देण्यास जिल्हा परिषद सर्व साधारण सभेची मान्यता घेणे आवश्यक आहे.
• जिल्हात ग्रामपंचायतींना या निधीतुन कर्ज वाटप करण्यात आले आहे.
| | डाउनलोड |
5 | पेसा 5% निधी योजना | जळगांव जिल्हयातील तीन तालुक्यातील चोपडा,यावल,रावेर येथील एकुण पेसा 32 ग्रामपंचायती आहे.सदर आदिवासी विकास विभागकडुन दरवर्षी पेसा ग्रामसभा कोष समिती गावनिहाय आदिवासी लोकसंख्या व दरडोईनुसार निधी शासनाकडुन पेसा ग्रामपंचायतीना थेट निधी प्राप्त झाले आहेत.
सदरचा निधीचा उपयोग हा खालील प्रमाणे निकषानुसार खर्च करण्यात येतो
अ) पायाभुत सुविधा-संबंधित पेसा गावातील ग्रामपंचायत कार्यालये,आरोग्य केंद्रे,अंगणवाडी शाळा,दफनभुमी,गोडाउून,गावांचे अंतर्गत रस्ते व तत्सम पायाभुत सुविधेसह.
ब) वनहक्क अधिनियम व पेसा कायदयांची अंमलबजावणी-
1)आदिंवासीनी त्यांच्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायाच्या संदर्भात प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण मार्गदर्शन करणे.2) गावतळी विकास किंवा मत्स्यपालन व्यवसाय/मत्स्यबीज खरेदी.3) सामाईक जमिनी विकसित करून देणे.4) गौण पाणीसाठयाचे व्यवस्थापन.5)सामाईक नैसर्गिक साधनसंपदा व सामाईक मालमत्ता विकसित करणे.
क) †Ö¸üÖêµÖ,þ֓”ûŸÖÖ,׿ÖIÉhÉ
1.ÃÖÖ¾ÖÔ•Ö×ÖEòú þ֓”ûŸÖÖMÉÞÆêü ²ÖÓÖ¬ÖhÉä2.MÉÖ¾ÖÖ´Ö¬µÖê स्वच्छता ¸üÖJÉhÉä.3.ÃÖÖÓ›ü¯ÖÖ{ÉÉhªÉÉSÉÒ ¾µÖ¾ÖãÖêMÉ]õÉ®úÒ बांध णे वत्याची ¤êüJɳÖÖ»Ö के.4.शुध्द पिण्याचे पाणी पुरवठा करणे
ड) ,वन्यजीव-संवर्धन,जलसंधारण,वनतळी,वन्यजीव पर्यटन व वनउपजिविकास याबाबत वरिल प्रमाणे ×ÖEòÂÖÖÖãÃÖÖ¸ü JÉ“ÖÔ Eò®úhªÉÉiÉ येतो.
| | डाउनलोड |
6 | पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2019 सन 2017-18 च्या मानांकनासाठी माहिती भरणे | ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद या तिनही संस्थाचे कामकाजावर आधारीत 100 गुणांची प्रश्नावली निश्चीत करण्यात आलेलेी आहे सर्वात चांगले काम करणाऱ्या व नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणारे ग्रामपंचायतीस पंडीत दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण या नावाने पुरस्कार देण्याची योजना सुरु करण्यात आले आहे. केंद्र शासनाने शासन निर्णय 26 सप्टेंबर 2018 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर योजनेतंर्गत ग्रामपंचायत/पंचायत समिती/जिल्हा परिषद केलेल्या कामाची माहिती शासनाच्या संकेत स्थळावर भरावयाची आहे. | | डाउनलोड |
विभागाशी संबंधित शासन निर्णय/परिपत्रके/आदेश
अ.क्र. |
निर्गमित आदेशाचे नांव |
प्रसिद्धी दिनांक |
अधिक माहिती |
1 | ५०/५५ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचारी यांच्या बाबत पुनर्विलोकन आदेश. | १०/०६/२०१९ | डाउनलोड |
2 | ग्रामपंचायत कर्मचारी आकृतिबंध | २१/०१/२००० | डाउनलोड |
3 | राहणीमान भत्ता सुधारणा 3 मार्च 2020 | ०३/०३/२०२० | डाउनलोड |
4 | शासकीय कार्यालयात धार्मिक फोटो न लावणे | ०४/०१/२०१७ | डाउनलोड |
5 | सर्वसाधारण बदली प्रक्रिया शासन निर्णय | १५/०५/२०१४ | डाउनलोड |
6 | 14 जुलै 2015 ग्रामीण_विकास_विभाग_सूचना | १४/०७/२०१५ | डाउनलोड |
7 | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 | २१/०८/२०१५ | डाउनलोड |
8 | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अधिसूचना | १२/०२/२०१९ | डाउनलोड |
9 | महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अधिसूचना | १३/०२/२०१९ | डाउनलोड |
10 | 14 वित्त आयोग निर्देशानुसार ग्रामविकास आराखडा | ०४/११/२०१५ | डाउनलोड |
11 | "आमचं गाव, आमचा विकास" उपक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत विकास अराखडा तयार करणेबाबत | २५/०९/२०२० | डाउनलोड |
12 | ग्रामीण क्षेत्रात इमारत बांधकाम परवानगी | ११/१२/२०१५ | डाउनलोड |
13 | जिल्हा ग्राम विकास निधी आधिनियम | ०१/०४/१९६० | डाउनलोड |
14 | जैव विविधता व्यवस्थापन समिती | ०२/०५/२०१६ | डाउनलोड |
15 | राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांचा पुतळा उभारण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे | ०२/०२/२००५ | डाउनलोड |
संपर्क
अ.क्र. |
संपर्क नाव |
अधिक माहिती |
1 | ग्रामविस्तार अधिकारी | डाउनलोड |
2 | विस्तार अधिकारी (पंचायत) | डाउनलोड |
3 | ग्रामसेवक | डाउनलोड |